test

बोईसर येथे महीलांचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

बोईसर येथे महीलांचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
पालघर : जिल्हा परिषद पालघर महिला व बालविकास विभाग पालघर अंतर्गत पंचायत समिती पालघर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पालघर विभाग दांडी -2 ,यांचे वतीने दिनांक 08-12-2023 रोजी बोईसर भीमनगर येथे   जिल्हा  परिषद सदस्य महेंद्र भोणे यांचे अध्यक्षतेखाली महिलांसाठीचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरात ऍड .आदेश बनसोडे, ऍड. शुभांगी बनसोडे सायली प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सुनीला भिसे यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराबद्दल विशेषतः हुंडा विषयक कायदे, स्रीधन, मालमत्ता अधिकार , वारसा हक्क, विवाह कायदा, घटस्फोट, पोटगी विषयक कायदे, बलात्कार विषयक कायद्यातील तरतुदी,बालविवाह कायदा,पोक्सो कायदा इत्यादि बाबत मार्गदर्शन केले.

 सदर प्रशिक्षण शिबिरास गावातील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.या प्रशिक्षण शिबिरासाठी माऊली महिला ग्रामसंघ भीमनगर अधक्ष्या माधवी भोणें यांनी विशेष सहकार्य केले. प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी गौरी धांगडा, पर्यवेक्षिका शकल्पना पिंपळे ANM व आशा वर्कर यांच्या योगदानाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 
सदर प्रशिक्षण शिबिरात उपस्थित सर्व महिलांना पोक्सो कायदा मार्गदर्शन बाबत पुस्तिका वाटप करण्यात आली.

 शिबिरामधे महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांना त्यांना कायद्या ची माहिती देण्यात आली त्यात हुंडा, बलात्कार असेल किंवा पोस्को इत्यादी बाबत बहुमुल असे मार्गदर्शन करण्यात आले,जे महिलांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि या कायद्यांचा उपयोग महिला योग्य त्या ठिकाणी होईल, असे मत जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे यांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.