test

गोर बंजारा समाजाचा महिला मेळावा छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न

गोर बंजारा समाजाचा महिला मेळावा छत्रपती संभाजी नगर  येथे संपन्न
गोर बंजारा समाजाच्या महिलांचा मेळावा छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला .या महिला मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सुनिता अशोक पवार ,(माजी साहित्य संमेलन अध्यक्ष )अलका राठोड (माजी महापौर सोलापूर )सुरेखा चव्हाण (पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजी नगर )पुष्पा पवार (उपविभागीय वनाधिकारी जालना) डॉक्टर संयोगिता नाईक (हेड ऑफ डिपारमेंट ससून पुणे) त्याचबरोबर प्रियंका रावसाहेब राठोड, पुणे शामलताई बळीराम राठोड ,सुरेखा चव्हाण, संगीता राठोड, प्रिया विनोद जाधव, डॉ.सुनिता भीमराव राठोड, मीनाक्षीताई बाबुलाल चव्हाण, इत्यादी महिला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
गोर सिकवाडी गोर सेना या बंजारा समाजाच्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .गोरबंजारा समाजातल्या अशिक्षित महिलांना उच्चपदस्थ असलेल्या बंजारा समाजातील महिलांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजांकडून सांगण्यात आले.सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी नगर  येथून सुरुवात करण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले 
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी  गोरसिकवाडी चे राष्ट्रीय संयोजक विलास भाऊ रामावत,गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण 
 यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.छ.संभाजीनगर येथील नियोजन करणारे  गोर सेनेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ राठोड, गोर सेनेचे एॅडवोकेट विंगचे मराठवाडा अध्यक्ष संदिप राठोड, विक्रम राठोड,योगिनाथ राठोड,नवनाथ राठोड, बळीराम राठोड, भिमराव राठोड,विजय पवार,सतिश चव्हाण,दिगांबर राठोड, डॉ.विलास राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदिप राठोड, प्रकाश राठोड,रुपालीताई राठोड, इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.