हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची ११० वी जयंती पालघर तेथे उत्साहात साजरी
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांची ११० वी जयंती नवनिर्माण सेवा संस्थेच्या वतीने " माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक चौक पालघर" या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवि भगवान राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शिवसेना बंजारा समाज (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा अध्यक्ष सुभाष उद्धव राठोड, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल तालुका अध्यक्ष रंजीत उत्तम चव्हाण,महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर शहर विभाग अध्यक्ष संजय उत्तम चव्हाण,गजानन शेषराव राठोड, सुभाष धर्मा राठोड, गजानन किसन चव्हाण उपस्थित होते.

No comments: