धनसारच्या सरपंचांचा धक्कादायक राजीनामा; पत्रात घरगुती कारणे, पण विकासकामांतील अडथळ्यांवर गंभीर आरोप
पालघर : धनसार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. राखी रवींद्र पाटील यांनी दि. ६ जुलै रोजी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी "काही घरगुती कारणांमुळे पुढील कार्यकाळ सांभाळता येणार नसल्याने सरपंचपदाचा राजीनामा देत आहे," असे नमूद केले आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर त्यांनी धनसार गावात विविध विकासकामे करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याची इच्छा होती. मात्र, काही ठरावीक सदस्य आणि ग्रामस्थांकडून कामकाजात सातत्याने अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप केला. या कारणांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
या आरोपांबाबत संबंधित सदस्य किंवा ग्रामस्थांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

No comments: