test

नगर अभियंता विपुल कोरपड यांची काम लपविण्याची धडपड; आदेश धाब्यावर

नगर अभियंता विपुल कोरपड यांची काम लपविण्याची धडपड; आदेश धाब्यावर

८३ लाखांचा रस्ता उद्ध्वस्त, तरीही कारवाई शून्य; संगनमताचा संशय तीव्र
पालघर प्रतिनिधी 

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या हद्दीत मॅकलॉड मुख्य रस्त्यापासून मनोर–माहीम मुख्य रस्त्यापर्यंत काँक्रिट गटार व रस्ता बांधकामाचे काम   तब्बल८३,८८,१११  रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेले रस्त्याचे काम अवघ्या पाच ते सहा महिन्यांतच उखडून पडल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
या प्रकरणात ठेकेदार मे. सिद्धिविनायक इंटरप्राईजेस, पालघर यांना नगर अभियंता विपुल कोरपड यांचे अभय असल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे दोषी ठेकेदारावर कारवाई टाळली जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांना हा प्रकार सविस्तर सांगितल्यानंतर त्यांनी स्वतः पाहणी करून संबंधित एजन्सीला नोटीस देण्याचे आदेश नगर अभियंता कोरपड यांना दिले होते.
मात्र, आठ दिवस उलटूनही कोरपड यांनी ना पाहणी केली, ना नोटीस काढली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. जनतेच्या पैशाचा उघड उघड अपव्यय होत असताना प्रशासनातील अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर नगर अभियंता विपुल कोरपड व संबंधित ठेकेदारावर संगनमत, निधी अपहार आणि लोकसेवा अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच त्यांच्यावर तातडीने विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक तथा पत्रकार रवी राठोड यांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.