test

सरपंच राखी पाटील यांचा भर पावसात रस्त्यावर उतरून विकास कामाची पाहणी

सरपंच राखी पाटील यांचा भर पावसात रस्त्यावर उतरून विकास कामाची पाहणी 
पालघर | प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील धनसार ग्रामपंचायतिच्या थेट सरपंच राखी पाटील या आज पावसात पालघर सातपाटी मुख्यरस्त्यावर सुरु असलेल्या जिल्हा परिषद सेज मधील गटाराच्या कामाला अडथळे येत असल्याने धनसारच्या थेट सरपंच राखी रविंद्र पाटील या स्वतः जातीने लक्ष देऊन सातपाटी मुख्य रस्त्यावरील काम पूर्ण करून घेत आहेत.
  या बाबत माहिती अशी की जिल्हापरिषद सेज फंडातून 
धनसार गावा साठी ६६ मीटर गटार मंजूर झाले असून ते काम मे. मंदार कोठारी हे कंत्राटदार करत असून गटाराचे काम करताना मुख्य रस्त्यावरील वाहतूक आणि ग्रामस्थांनचा विरोध या सर्व बाबी लक्षात घेता,धनसार ग्रामपंचायतिच्या थेट निवडून आलेल्या सरपंच राखी रवींद्र पाटील, उपसरपंच मंगला पाटील, आणि ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून, कंत्राटदाराला मदत म्हणून सरपंच यांचा मालकीच्या मंगलमूर्ती डेकोरेटर्स च्या कामगारांना ही कामाला लावून मुख्य रस्त्यावरील गटाराचे काम शर्तीचे प्रयत्न करून पूर्ण करून घेत आहेत, ही बाब सामाजिक सेवकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनीही या सरपंचांच्या या कामाला दाद दिली.

कोट /-
गावाच्या विकासाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन, गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून मी आणि आमचे सहकारी स्वतः देखरेख करून काम पूर्ण करून घेत आहोत.
--राखी रविंद्र पाटील, थेट सरपंच, धनसार ग्रामपंचायत.

कोट /-
पावसामुळे कामात व्यत्यय येत असून, सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभत आहे6

?
Yp a
--मंदार कोठारी, कंत्राटदार.

No comments:

Powered by Blogger.