test

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, तसेच कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ओबीसी समाजाची मागणी

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, तसेच कुणबी प्रमाणपत्र देऊ नये  ओबीसी समाजाची मागणी
सरकारने संवेदनशीलता दाखवून ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये अशी प्रखर मागणी सध्या ओबीसी समाजामधून सर्वत्र जोर धरत आहे. पालघर जिल्ह्यातही ओबीसी समाजाने एकत्र येत याच पार्श्वभूमीवर ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले. पालघर शहरातील लायन्स क्लब हॉलमध्ये पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे नेते प्रतिनिधी व समाज बांधव या एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने हजर होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी या एल्गार मेळाव्यातून करण्यात आली. त्याचबरोबर बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करावी अशी मागणी एल्गार मेळाव्यातून करण्यात आली. याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवून ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजाने सरकारला दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.