test

रुपेशच्या कुटुंबियांना मदतीचा आधार

रुपेशच्या कुटुंबियांना मदतीचा आधार
       गेल्या काही दिवसांपूर्वी बोईसर येथील पाम - टेंभी  मुख्य रस्त्यावर झालेल्या अपघातात नवापूर गावातील रुपेश बारी व नरेंद्र बारी या तरुणांचे दुर्दैवी निधन झाले होते . दोघेही नवापूर गावातील असल्याने व कमी वयात ही घटना घडल्याने पूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली.
     रुपेश बारी यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,आई- वडील,भाऊ व शाळेत शिकणारी लहान मुले असं कुटुंब असल्याने व रुपेश ही कंत्राटपद्धतीत कामावर असल्याने त्यांची बायको  व मुलाच्या पुढील भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी जी एम सिंथेटिक कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून जरी अपघात रस्त्यावर झाला असला व रुपेश कंत्राटी कामावर असला तरी कंपनीने मुलांच्या पुढील भविष्याच्या दृष्टीने अधिकाधिक सहकार्य करावे ही मागणी केल्यानंतर कंपनीनेही यावर रुपेशच्या पत्नीच्या नावावर आठ लाख रुपये जमा केले व रुपेश च्या पत्नीची इच्छा असल्यास तिला कामावर घेऊ असे आश्वासीत  केले.
     या कठीण प्रसंगात सहकार्य  केल्याबद्दल  रुपेशची पत्नी व कुटुंबीयांनी  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे व कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले याप्रसंगी रुपेशच्या कुटुंबियांसोबत पहिल्या दिवसांपासून असण्याऱ्या नवापूरच्या सरपंच अंजली बारी, सामाजिक कार्यकर्ते विजय बारी व कुंभवली उपसरपंच अमित संखे उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.