test

डहाणू सरावली येथे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम

डहाणू सरावली येथे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम


डहाणू तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम  कबरस्थान येथे अल्पसंख्याक बहुल ग्रामीण मूलभूत सुविधा योजने अंतर्गत गटार व रस्ता तयार करण्याचे काम सरावली ग्रामपंचायती कडून एका ठेकेदाराला देण्यात आले होते, परंतु सदर ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून सरावली ग्रामस्थांकडून सदर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
सरावली ग्रामपंचायती मार्फत कबरस्थान येथे गटार व रस्ता तयार करण्याचा १०,९१,६०४ रुपयांचा अंदाजित रकमेचा  कामाचा ठेका रुद्विक जितेंद्र पटेल या ठेकेदाराला देण्यात आले आहे, परंतु हे काम करताना सदर ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे सरावली ग्रामस्थ संतापले आहे. कबरस्थानच्या बाहेर रस्त्याला लागून बांधण्यात आलेल्या मोरीच्या कामाच्या काँक्रेटिकरणात निकृष्ट दर्जाचा साहित्य वापरल्या गेल्याचा आरोप सरावली ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पटेल या ठेकेदाराकडून बांधण्यात आलेल्या सदर मोरीला पाय लावताच मोरीचा भाग तुटून पडत आहे. तसेच काँक्रीट झालेल्या कामावर पाणी मारले जात नसल्याने ही हे काँक्रीट तुटून पडत आहे,  त्यामुळे या निकृष्ट दर्जाचे कामामुळे सरावली ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे. म्हणून सदर कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया-१

आम्ही ठेकेदाराकडून योग्य ती दुरूस्ती करून घेत आहोत, तसेच ठेकेदाराचा बिल थांबवायला ही ग्रामपंचायतीला कळवले आहे.

बी. बी. धारणे
शाखा अभियंता, 
पंचायत समिती, डहाणू

प्रतिक्रिया.२

काम पूर्ण व चांगले झाल्याशिवाय ठेकेदाराला बिल दिले जाणार नाही.

जयश्री वैती
ग्रामसेविका
ग्रामपंचायत सरावली

No comments:

Powered by Blogger.