जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुलाट
--तक्रार होऊनही प्रशासनाची बघ्याची भूमिका
पालघर जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात गोर गरीब जनता उदरनिर्वाह करणे करिता ग्रामीण भागातून शहरी भागात येत असतात. त्या ठिकाणी राहताना त्यांच्या जीवनशैली बदल झाल्यामुळे ते काळानुरूप ते आजारी पडतात, या गोष्टीचा फायदा सद्या औद्योगिक वसाहतीत वस्ती करून राहणाऱ्या कामगार लोकांच्या जीवाशी खेळणारे अनेक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन उपचाराचे दुकान थातून बसलेले बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. या कडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे.डॉक्टरांना महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ची मान्यता घेतल्या शिवाय महाराष्ट्रा राज्यात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.पण कुठलाही पर राज्यातील डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ची मान्यता घेताना दिसत नाही.तसेच क्लिनिक किंवा दवाखाना सुरु करताना स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे असताना,उलट काही डॉक्टरांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सर्टिफिकेट घेऊन व्यवसाय करत असल्याचे काही पत्रकारांच्या निदर्शनास आले आहे. त्या बाबत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार केली असता,महिना उलटूनही कारवाई शून्य असल्याचे दिसून आले आहे.फक्त नोटीस देण्या पलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही. दोन दिवस दुकान बंद केल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागात गोर गरीब जनता काबाड कष्ट करून पोट भरत असताना वैद्यकीय गरज ही त्यांची मूलभूत अधिकार असताना, आरोग्य केंद्रात न जाता जवळच्या उपलब्ध डॉक्टर कडे जाणे पसंत करतात. पण जवळ गाव खेड्यात उपलब्ध असलेले डॉक्टर हे बोगस असण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवली जात आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोट /-
बोगस डॉक्टर कार्यरत असतील तर त्यांचा शोध घेऊन, चौकशी करून सक्त कारवाई करण्यात येईल.
--डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर.
कोट /-
बोगस डॉक्टर हे समाजाला लागलेली कीड असून अश्या लोकांवर सक्त कारवाई करण्यात यावी.कारवाई चे अधिकार असलेले अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत.
--राजेंद्र ढगे, रुग्ण मित्र.

No comments: