आर टी ओ कॅम्पला दलालांचा विळखा
पालघर शहरात आर टी ओ ट्रॅक साठी मान्यता प्राप्त जागा नसल्याने तात्पुरता स्वरूपात आर टी ओ कॅम्प नगरपरिषद हद्दीतील जुना सातपाटी रोडवर एका मैदानावर गुरुवार आणि शुक्रवारी होत असून गाड्या पासिंग साठी या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने फक्त ड्राइविंग लायसन्स आणि मोटर सायकल पासिंग होत आहे.
या ठिकाणी आर टी ओ कॅम्पला दलालांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असते,सर्व सामान्यांची कामे होताना दिसत नाहीत, जर तुम्ही दलाला मार्फत काम केले तर लायसन्स, गाडी पासिंग लवकर होते. सामान्य रीक्षा चालकांना देखिल गाडी पासिंग साठी विरार ला जावे लागते.विरारला सकाळी पहाटे निघून सुद्धा संध्याकाळ पर्यँत कामे होत नाहीत. तेच काम जर दलालान मार्फत केले तर ते लवकर होते अशी धारणा सर्व सामान्यांन मध्ये झाली असून या मुळे नागरिकांन मध्ये चुकीचा संदेश जाऊन समाजात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाऊ शकते.म्हणून आर टी ओ कॅम्प मध्ये दलालांना प्रवेश बंद करावा अशी मागणी मनसे विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष धिरज गावड यांनी केला आहे. तसें न केल्यास आर टी ओ कार्यालयावर निषेध मोर्च्या काढण्यात येईल असे प्रतिनिधी बोलताना सांगितले.
पालघर जिल्हा हा आदीवासी बहुल जिल्हा असून या भागात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्या मुळे या भागात बाहेरून येऊन काम करणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्या मुळे स्थानिक नागरिक दलालांना पैसे देऊ शकत नसल्याने बिना परवाना गाडी चालवण्याची संख्या ही जास्त आहे.
ठळक /-
शासन आपल्या दारी....
पालघर जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत शासन आपल्या दारी म्हणून अभियान चालवले जात असून सर्व प्रकारचे दाखले या अभियाना मार्फत वाटले जातात,मग गाडी चालवायचे लायसन्स का असे टेस्ट घेऊन तात्काळ वाटले जात नाही..? असा प्रश्न सामान्या नागरिकांन कडून विचारला जात आहे.गाडी चांगल्या प्रकारे चालवू शकणारे आहेत त्यांना टेस्ट घेऊन ड्रायव्हिंग लायसन्स वाटप का करण्यात येत नाही.
चौकट /-
या बाबत परिवहन विभागाची प्रतिक्रिया घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

No comments: