test

पालघर येथे शिवसेनेच्या वतीने शाळकरी मुलांना वह्या वाटप

पालघर येथे शिवसेनेच्या वतीने शाळकरी मुलांना वह्या वाटप
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण हे शिवसेनेचे घोषवाक्य लक्षात घेऊन शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील व माध्यमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी शिवसेनेचे पालघर तालुका प्रमुख संजय चौधरी, पत्रकार शरद पाटील, माहीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक करबट, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊत, जयवंत लडे, अनिकेत भोमटे, नरेश वांगंड आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.