test

ग्रामपंचायत उमरोळी आयाएसओ नामांकन प्राप्त

ग्रामपंचायत उमरोळी आयाएसओ नामांकन प्राप्त 

पालक मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सन्माचिन्ह देऊन गौरव.

पालघर: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त  ग्राम पंचायत उमरोळी , ता. जि .पालघर  आयएसओ नामांकन प्राप्त झाले . सदरचे आयएसओ नामांकन , प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह पालघर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार  गणेशजी नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.
ग्रामपंचायत उमरोळी येथील आयाएसओ नामांकन साठी त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्यात आले त्यामध्ये ग्रामपंचायती मध्ये असलेले निकष पूर्ण करण्यात आले त्या निकष्यामध्ये ग्रामपंचायतीचा परीसर स्वच्छ असले पाहिजे 
 ग्रामपंचायती मध्ये आलेल्या ग्रामस्थांना बसण्याची व्यवस्थीत व्यवस्था असणे आवश्यक आहे 
 गावातली ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय असणे 
 ग्रामपंचायतीच्या बाहेर तक्रार तक्रारदार करिता  सूचना पेटी पाहिजे,ग्रामपंचायतीच्या बाहेर नोटीस बोर्ड लावले असले पाहिजे,पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय पाहिजे, किचन ओटा,बेसिन पाहिजे,ग्रामस्थांना वाचण्यासाठीपुस्तके(वाचनालय) पाहिजे 
 फायर ऍक्सिट पाहिजे,ग्रामपंचायती मध्ये सर्व कक्षा बाहेर  कक्षाची माहिती दर्शविणारे फलक असले पाहिजे, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश पाहिजे,ग्रामपंचायतीचे दफ्तर व्यवस्थित लावुन नावे पाहिजे 
 आरोग्यासाठी औषधं उपलब्ध पाहिजे,ग्रामपंच्यातला मिळालेली बक्षीस  व्यवस्थित लावली पाहिजे, प्रत्यक टेबलावर फुलांची सजावट पाहिजे 
 प्रत्येक खुर्चीवर पांढरे रुमाल पाहिजे अशा सर्व निकषाशाचे तंतोतंत पालन केल्याचे त्रयस्थ संस्थे मार्फत केलेल्या ऑडिट मधे निष्पन्न झाल्याने ग्रामचायत उमरोळी आय एस ओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायत ठरली आहे. पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री कडून ग्रामपंचायत उमरोळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामचायत सदस्य यांचे प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी 
पालघर लोकसभा खासदार खासदार  हेमंतजी सवरा , पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम , मुख्यकार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगताप   ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत   अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Powered by Blogger.