पालघर (वाडा ) : ब्लयु बेरी ॲग्रो कंपनीच्या अनागोंदी कारभारा बाबत ग्रामपंचयात मांडा-वावेघर यांनी सभापती आरोग्य व बांधकाम संदेश ढाणे यांचेकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती त्या अनुषंगाने सभापती, संदेश ढाणे यांनी कंपनीच्या अनागोंदी कारभाराची पाहणी करण्यासाठी प्रशासनास विनंती करून त्या अनुषंगाने सदर कंपनीची दिनांक 12.07.2024 रोजी अकस्मात भेट देऊन पाहणी करण्यात आली. प्रथम दर्शनी पहाणी दरम्यान असे निर्दशनास आले कि, कंपनी मार्फत सोडण्यात येणारे दूषित पाण्याची योग्य रित्या विल्हेवाट लावली जात नाही, तसेच सदर पाणी लगतच्या वस्ती मध्ये सोडले जाते त्यामुळे वस्तीजवळचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषीत होण्याच्या मार्गावर आहेत तसेच वस्तीमध्ये कंपनीच्या सांडपाण्यामुळे व उग्र वासामुळे आजारपणाचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांची तक्रार आहे, तसेच सदर कंपनी हि वस्तीलगत असल्याने या कंपनीमार्फत मोठया प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होत असून कंपनीचा बॉयलर हा वस्तीलगत असल्याने स्थानिकांमधे यापुर्वी बॉयलर स्फोट झाल्याच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची भिती निर्माण झाली आहे. सदर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी हे कोणत्याही सुरक्षे शिवाय काम करतांना परिसरात आढळून आले व सदर कपंनीमध्ये कोणत्याही प्रकारची अग्नी प्रतिबंधात्मक उपयोजना केल्याचे दिसुन आले नाही, यास्तव सदर कंपनी हि औदयोगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करत नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच ही कपंनी हि 24 तास सुरु असल्याने सदरच्या कंपनी मार्फत प्रदुषण व त्याद्वारे होणारी हानी यावर या कंपनीचे नियंत्रण नसल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लघन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ब्ल्यू बेरी ॲग्रो कंपनी मार्फत होणाऱ्या समस्या पहाणी करतावेळी प्रदुषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे ग्रामस्थांचे शिबिर आयोजित करुन आरोग्य तपासणी करणे, कंपनी परिसरातील पाणी नमुने तपासणी करणे तसेच कंपनी मुळे होणाऱ्या प्रदुषाची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियम व निकषानुसार चौकशी करणे, कंपनीच्या जागे व बांधकामाबाबत माहिती महसुल व नगर रचानाकार यांचेकडून माहिती उपलब्ध करुन प्राप्त अहवालांच्या अनुषंगाने सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करणेचे सर्वानुमते पाहाणीच्या वेळी ठरविण्यात आले.
यावेळी सभापती, आरोग्य व बांधकाम समिती, संदेश ढोणे यांच्या समवेत सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. साळुंखे, गट विकास अधिकारी वाडा, डॉ.वैभव साफळे, जि. प. सदस्य अक्षता चौधरी, क्षेत्रीय अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ भुसारा, तालुका आरोग्य अधिकारी वाडा डॉ.तुपकर, सरपंच श्रीम.वेदिका दळवी, उपसंरपंच अमता ठाकरे, तलाठी, राजेश पितळे, ग्रामसेवक यतिन शिंदे, विस्तार अधिकारी (ग्रा.प) अहिरे, आरोग्य सहाय्यक जैवाल, आरोग्य सहाय्यक जोगमार्गे, ग्रा. प. सदस्य रिध्दी राऊत, ग्रा. प. सदस्य अदिती ठाकरे, ग्रामस्थ स्वप्नील ठाकरे जयवंत जाधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments: