आई जगदंब संघातर्फे मोफत उत्पन्न दाखल्याचा कार्यक्रम सरपंच राखी रवींद्र पाटील यांचा या कार्यक्रमाला मोठा हातभार.
पुढेही गावाकरिता असेच कार्यक्रम राबवावे सामाजिक कार्याने गावाला नवी दिशा मिळेल.
पालघर : धनसार गावात प्रथमच आई जगदंब संघाने शालेय शिक्षणासाठी मोफत उत्पन्न दाखला उपक्रम राबवला आहे.
या कार्यक्रमासाठी धनसार गावाच्या सरपंच राखी रवींद्र पाटील यांनी उपक्रमासाठी मोठा हातभार लावला पुढेही आई जगदंब संघाने गावाच्या भल्या करिता वेगवेगळे उपक्रम आपल्या हाती घ्यावे मी नक्कीच तुम्हाला मदत करीन असे आश्वासन धनसार गावाचे सरपंच सौ राखी पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. शाळेय सुट्टया संपताच पुढच्या वर्षाच्या शालेय दाखल्या करिता पालकांना संबंधित तालुका कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्या करिता धावपळ करावी लागते. सरकारी कार्यालयात पालकांना वारंवार फेऱ्या मारव्या लागू नये व विद्यार्थी पालकांना गावातच सोयीस्कर पद्धतीने उत्पन्नचा दाखला मिळावा हा हेतू लक्षात ठेवून आई जगदंब संघाने हा उपक्रम हाती घेतला होता. "सरकार आपल्या दारीं " प्रमाणे "दाखला आपल्या गावी" असा स्वरूप असलेला ह्या उपक्रमास धनसार ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सरपंच राखी पाटील यांच्या मदतीने आणि आई जगदंब संघाच्या सामाजिक दृष्टीकोनाने मोफत उत्पन्न दाखला कार्यक्रम राबवण्यात आला तर शंभरहून अधिक पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सुविधेचा लाभ घेतला.
या वेळी धनसार गावाचे सरपंच राखी रविंद्र पाटील, ग्रामपंचायत धनसार ह्यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम पार पडला, उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली धनराज पाटील, सौ, आरती रुपेश माळी व श्री. बळवंत ठक्या पाटील व आई जगदंब संघाचे ऑनर श्री. रुपेंद्र मोरे, जितेश भोईर, विशाल भोईर, शैलेश माळी, सिद्धार्थ पाटील, धीरज भोईर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांनी उपक्रमाचे व सघांचे कौतुक केले. तसेच यापुढे ही आपण आपल्या गावात असेच समाजाला उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविण्यात यावे ह्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सरपंच सौ. राखी रविंद्र पाटील ह्यांनी केले.

No comments: