पालघर जिल्हा टेबल टेनिस मानांकन स्पर्धा संपन्न
पालघर ( वसई ) : पालघर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि यंग मेन्स कॅथॉलिक असोसिएशन, माणिकपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या सहकार्याने ५ व ६ ऑगस्ट रोजी दुसऱ्या जिल्हा मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आठ विविध वयोगटात खेळलेल्या आणि दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पालघर जिल्हयातील टेबल टेनिसपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने पुरुष गटात तविष मेनेझिस, महिला गटात खुशी पुथरन, १९ वर्षांखालील गटात मृण्मय पाटील तर ३९ वर्षांवरील गटात प्रकाश आल्मेडा हे नवीन विजेते मिळाले.तसेच स्पर्धेचे इतर निकाल : ११ वर्षांखालील मुले विजेता : आराध्य वर्तक उपविजेता : अंश कुरूप १३ वर्षांखालील मुले विजेता : पार्थ भोयर उपविजेता : हर्षित कटके १५ वर्षांखालील मुले विजेता : नुराज मेमन उपविजेता : शयान शेख १७ वर्षांखालील मुले विजेता : नुराज मेमन उपविजेता : तविश मेनेझिस १९ वर्षांखालील मुले विजेता : मृण्मय पाटील उपविजेता : नुराज मेमन ३९ वर्षांवरील पुरुष विजेता : प्रकाश आल्मेडा उपविजेता : सुरेश कुरूप महिला गट विजेती : खुशी पुथरण उपविजेती : अनन्या गोंसालवीस पुरुष गट विजेता : तविष मेनेझिस उपविजेता : सॅबी डीऍब्रिओ बॅसीन कॅथलिक को-ऑप बॅंकेचे अध्यक्ष बेनॉल डायस, संचालक डॉमणिक डिमेलो, पायस आल्मेडा, वायएमसीएचे अध्यक्ष मर्यान आल्मेडा, पालघर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे युगांत वाळींजकर, बॅसीन कॅथलिक बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक सपना डिकोष्टा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

No comments: