जुनी पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली
राज्य गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या मार्फत जुनी पेंशन सह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभर बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यात देखील गट ड महासंघ चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, महाराष्ट्र राज्य ज़िल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप चौधरी व राज्य सचिव मुकुंद तुरे यांच्या मार्गदर्शनाने ज़िल्हा परिषद ज़िल्हा अध्यक्ष तथा राज्य सहसचिव परिचर संघटना किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली.
जुनी पेंशन लागू करणे,सर्व खात्यातील परिचर रिक्त जगा भरणे, तसेच इतर मागण्यांवर यावेळी लक्ष वेधण्यात आले.
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकापासून दांडेकर महाविद्यालय मार्गे ज़िल्हा परिषद पालघर येथे रॅलीची सांगता झाली.यामधे ज़िल्ह्यातून संघटनेचे सचिव अरविंद खैरनार, कार्याध्यक्ष राहुल वडे, कोषाध्यक्ष मधुकर पाटील, सदस्य विनोद पाटील, इतर परिचर पदाधिकारी सदस्यांनी सहभाग घेतला.

No comments: