test

जागतिक आदिवासी दिनी निराधार व्यक्तींना धान्य किट वाटप

जागतिक आदिवासी दिनी निराधार व्यक्तींना धान्य किट वाटप
पालघर ( नंडोरे ) ग्रामपंचायत नंडोरे देवखोप च्या वतीने ९ ऑगस्ट  जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावातील निराधार व्यक्तींना धान्य किट वाटप करण्यात आले ग्रामपंचायत नंडोरे ग्रामपंचायत नेहमीच गोर गरीब निराधार व्यक्ती तसेच अंध अपंग व्यक्ती करिता विविध योजना राबवत असते. आझादी का अमृत महोत्सव च्या वेळी ही जेष्ठ नागरिकाचा सन्मान करण्यात आला होता तसेच त्यांना पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सीमा शशिकांत पाटील सरपंच  सोनल शरद घोडके उपसरपंच रोहन भरत वेडगा ग्राम विकास अधिकारी  निलेश देवरे ग्रामपंचायत सदस्य  विलास कृष्णा लहांगे जयेश सुदाम पडवळे  भरत काशिनाथ घोडके सुचिता मिलिंद पाटील मानसी मंगेश तरे, स्मिता संदीप उमतोल माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद काशिनाथ पाटील पेसा अध्यक्ष सुरेंद्र सांबरे विकास सहकारी सोसायटी चेअरमन संदीप पाटील सौ दीपा लडे मोबिलायझर मिनेश पाटील  लीला पाटील  दशरथ बसवत यांच्या सह ग्रामस्थ तसेच   कर्मचारी  उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.