test

पालघर तालुका व पालघर शहर काँग्रेसची संभाजी उर्फ मनोहर भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालघर तालुका व पालघर शहर काँग्रेसची संभाजी उर्फ मनोहर भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
 पालघर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या संभाजी  उर्फ मनोहर भिडे विरोधात तीव्र आंदोलन पालघर हुतात्मा चौक पाचबत्ती येथे करण्यात आले. यावेळी संभाजी उर्फ मनोहर भिडे विरोधात , केंद्र व राज्य सरकार विरोधातील घोषणांनी पालघर परिसर दणाणून सोडले. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अविश राऊत ,तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी , पालघर किसान काँग्रेसचे पुंडलिक घरत ,  पालघर जिल्हा सरचिटणीस मनोज दांडेकर , पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. 
       यावेळी संबंध मानवतेला काळिमा फासणाऱ्या मणिपूर घटनेवरून तसेच देशातील वाढत असलेली जातीय व धार्मिक नफरत , बेरोजगारी  ,महागाई व  विविध ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना पुढे करून महापुरुषांविरोधात अश्या पद्धतीचे बेताल वक्तव्य करण्यास प्रवृत्त करून जनतेचे मणिपूर घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच संभाजी भिडे यांना पुढे केले जात असल्याचे आरोप यावेळी प्रदेश प्रवक्ता अविश राऊत यांनी केले . ते पुढे म्हणाले की भीमाकोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी संभाजी उर्फ मनोहर भिडे असतानाही त्यावेळेचे बीजेपी सरकारने चौकशी अंती त्याला सोडून दिले होते. संभाजी भिडे हे आपल्या बेताल वक्तव्याने समाजामध्ये नेहमी तेढ निर्माण करण्याचे व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे काम करतात. ज्या महापुरुषांनी समाजात समता व समानता पेरण्याचे काम केले. गोर गरीब वंचित समूहास न्याय देण्याचे काम केले , सबंध आयुष्यभर देशाची सेवा केली , देशासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळी झेलून देशासाठी प्राण दिले. अशा महापुरुषांबद्दल तसेच थोर संतांवर वारंवार बेताल वक्तव्य करत असताना , देशात अंधश्रद्धा पसरवित असताना , टिकली लावली नाही म्हणून महिलांचं अवमान करत असताना सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई संभाजी उर्फ मनोहर भिडे वर करत नाही. याचाच अर्थ की केंद्र सरकार व राज्य सरकार हे संभाजी उर्फ मनोहर भिडे  यांना मोकळीक देतात का? त्यांना पुढे करतात का?  असे प्रश्नच आता देशातील जागरूक जनता उपस्थित करीत आहे.
             पालघर तालुकाध्यक्ष राजेश अधिकारी यांनी आपल्या भाषणात संभाजी उर्फ मनोहर भिडे हा समाजामध्ये व देशातील जनतेत द्वेष पसरविण्याचे काम करत असून , या मनोहर उर्फ संभाजी भिडेला देशाचे स्वातंत्र्य मान्य नाही,  देशाचा तिरंगा झेंडा मान्य नाही  , देशाचे राष्ट्रीय गीत मान्य नाही , त्यामुळे हा देशद्रोही असून याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पालघर तालुकाध्यक्षांनी केली. परंतु सरकार हे भिडेंवर कारवाई करत नसून संभाजी भिडेला वारंवार मोकळी देत असल्याचा आरोपी तालुकाध्यक्ष राजेश अधिकारी यांनी केले.
                पालघर जिल्हा काँग्रेस किसान सभेचे पालघर जिल्हाध्यक्ष पुंडलिक घरत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून संभाजी भिडे हा समाजात द्वेष पसरवत असून , असे बेताल वक्तव्य करून देशातील जनतेचे प्रमुख व ज्वलंत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्याचे काम मनोहर उर्फ संभाजी भिडेच्या माध्यमातून बीजेपी सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आज देशात अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना केंद्र सरकार व राज्यातील बीजेपी सरकार हे नाकाम झाले असून मनिपुर सारख्या घटनेतून नाकाम सरकारचे अपयश आता जनतेसमोर येत आहे.
         जगाने ज्या महापुरुषाला राष्ट्रपिता संबोधले , राष्ट्रपिता मानले त्या महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व वारंवार महापुरुषांबद्दल तसेच देशामध्ये अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करत असताना सुद्धा केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार भिडे वर कारवाई  का करत नाही? असा प्रश्न काँग्रेसचे मनोज दांडेकर त्यांनी उपस्थित केला. 
        तसेच पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना वारंवार आमच्या महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत असताना काँग्रेस आता शांत बसणार नसून असे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पालघर जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येऊन , आंदोलनातून उत्तर दिले जाईल असे सांगून उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
             यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश नम , सुधीर जैन, रसिक भानुशाली , रोहित चौधरी रामदास हरवटे ,रोशन पाटील,   शैला प्रसाद , मनीषा कालपुंड, रामप्रकाश निरालाजी , संदीप मेने , सुनील इंगोले,संतोष घरत  तसेच राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे लक्ष्मण रखमे , आशा गवई , मनोज साळवे , संदीप राठोड , सिद्धार्थ वाघमारे , सौरव ठोंबरे , विक्की साळवे , किरण कांबळे, श्रवण यादव , अर्जुन बशीरे , साहेबराव मळे , रमेश जोरेवार , चरणदास चंद्रे , रुपेश खुर्द , किरण शेंडे , शदाब शेख ,उमर शेख , राम कुशवाह , शरद लांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.