test

योगेश चांदेकर यांची पत्रकारिता आदर्श

योगेश चांदेकर यांची पत्रकारिता आदर्श
 तृप्ती देसाई यांचे गौरवोद्गार, अभिष्टचिंतन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाचे प्रतिबिंब उमटवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. समाजकारणाचा प्रमुख कणा म्हणून पत्रकारांची प्रमुख ओळख आहे. अशाच पत्रकारांपैकी एक असलेल्या योगेश चांदेकर यांनी  केलेले कार्य समाजोपयोगी ठरले आहे. वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेली पत्रकारिता हे आदर्श उदाहरण आहे, असे गौरवोद्गार भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तथा बिगबॉस फेम तृप्ती देसाई यांनी काढले.
पत्रकार योगेश चांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी, 28 जुलै रोजी पालघरमधील सतू ऑरा येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. याप्रसंगी तृप्ती देसाई यांनी संबोधित केले. योगेश चांदेकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय राहून केलेल्या वार्तांकनाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला सक्षमीकरणावरही त्यांनी भूमिका मांडली. आजच्या युगात महिलांना आवश्‍यक ते स्थान मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे देसाई म्हणाल्या.
मराठी गायक तथा मराठी बिग बॉस फेम संतोष चौधरी (दादूस) यांनीही याप्रसंगी योगेश चांदेकर यांचे कौतुक केले. योगेश यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केलेल्या वार्तांकनातून पालघर जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न सोडवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य समाजहिताचे व दिशादर्शक असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी, उपेक्षित घटकांसाठी योगेश चांदेकर नेहमी झटत असतात. त्यांच्या बातम्यांची दखल घ्यावी असे त्यांचे कार्य आहे, अशा शब्दांत चांदेकर यांचे कौतुक केले. यापुढेही चांदेकर याच भावनेने आणि हिरीरीने पत्रकारितेचे कार्य करतील, असा विश्‍वास व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याशिवाय वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले अनेक मान्यवर हे चांदेकर यांनी केलेल्या कामाचे फलित आणि यश असल्याची प्रतिक्रिया पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला केदार काळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
..
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

योगेश चांदेकर आणि त्यांचा मुलगा विआन या दोघांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी चित्रपट अभिनेते निर्भय वाधवा आवर्जून उपस्थित होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रमोद पिंपळे होते. कार्यक्रमाचे निवेदन साम टीव्हीच्या निवेदिका फरहा खान यांनी केले. या सोहळ्यास
शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, कुंभवलीच्या सरपंच ऍड  तृप्ति संखे,नंडोरेचे उपसरपंच रोहन वेडगा, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी तनवीर शेख, लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधि तथा जेष्ठ पत्रकार नीरज राऊत पालघर मित्रचे संपादक पंकज राऊत, आजतक तसेच टिव्हि९ मराठीचे मोहम्मद हूसैन खान,  पुढारीचे  निखिल मिस्त्री,दैनिक सामानाचे जिल्हा प्रतिनिधि सचिन जगताप,दैनिक पुढारीचे मंगेश तावड़े,दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधि संतोष चूरी, पत्रकार प्रमोद दैनिक नवशक्तिचे नितीन बोंबाडे, रहीम कुरेशी , प्रमोद तिवारी,ज्ञानेश्वर रामोशी,रवी राठोड़, मनसेचे पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई, शहराध्यक्ष सुनील राऊत, तसेच जिल्हातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी चांदेकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Powered by Blogger.