जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८४ वी जयंती उत्साहात साजरी
सर्वधर्म समभाव, एकता, अहिंसा, बंधूभाव असे अनमोल शिकवनूकीने जगाला प्रकाश देनारे जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती नवनिर्माण सेवा संस्थेच्या वतीने
१५ फेब्रुवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील *(डी सी इंटेरियर)* समोर उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून दुचाकी रॅलीही काढण्यात आली.
सदर रॅली सुभाष राठोड जिल्हा अध्यक्ष शिवसेना बंजारा समाज (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. शांती नगर - हुतात्मा चौक - पालघर रेल्वे स्टेशन मार्गे - छत्रपती शिवाजी महाराज चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यथे कार्यक्रम स्थळी रॅली आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी भगवान राठोड यांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच बंजारा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष श्रीराम चव्हाण, राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हा उपाध्यक्ष बळीराम चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भोग लावण्यात आले त्या नंतर सदर रॅली वसंतराव नाईक चौक येथे आली यावेळी नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले
आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम एकनाथ चव्हाण, विठ्ठल शिवाजी राठोड, पंढरी कुंडलिक चव्हाण, संदिप रंजीत चव्हाण, राहुल विजय राठोड, प्रदीप सुनील चव्हाण, आकाश भारत चव्हाण, राहुल देविदास राठोड विनोद नानू चव्हाण, सुरेश सुभाष राठोड, आदींनी परिश्रम घेतले. तसेच बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments: