पालघर येथे 'फसल बिमा सप्ताह' याचा प्रारंभ
पंतप्रधान फसल बिमा योजने अंतर्गत फसल बिमा सप्ताह १ ते ७ डिसेम्बर संपूर्ण देशात राबवला जात आहे. त्याअनुषंगाने आज तालुका अधीक्षक कृषी कार्यालय या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून उपस्थित तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या सानिध्यात ह्या योजनेचा प्रारंभ पार पाडला.
यावेळी जिल्हा व तालुका कृषी व सांख्यकी अधिकारी तरुण वैती, जिल्हा कृषी फलोउत्पादक अधिकारी सुभाष नाईक, कृषी सहाय्यक अधिकारी पूजा संखे, अविनाश पाटील व इतर कृषी सहाय्यक, जिल्हा अधिकारी व तालुका प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित होते.

No comments: