रास्त भाव धान्य दुकान नं-3 चा परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी तरीही प्रशासन दुकांदारावर मेहेरबान
रास्त भाव धान्य दुकान नं-3 चा परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी
तरीही प्रशासन दुकांदारावर मेहेरबान
दुकानदारकाकडून ग्राहकांना शासनाकडून मिळणार धान्य योग्य पद्धतीने दिल जात नसल्याचा आरोप करत माहीम येथील ज्योती पटेल यांच्या मालकीचं रास्त भाव दुकान शासनाने पुन्हा एकदा चालू केल्याने माहीम गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत या परिसरात गोंधळ घातला. महाराष्ट्र शासनाच्या या रास्त भाव दुकानदाराकडून ग्राहकांवर मुजोरी तसेच योग्यरित्या धान्य पुरवठा केला जात नसल्याचा ग्रामपंचायत कडून तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे दुकान बंद करण्यात आला होता परंतु पुन्हा हे दुकान सुरू केल्याने ग्रामस्थांनी दुकानदारासह प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
माहीम हद्दीतील रास्त भाव धान्य दुकान नं-3 चे दुकानदार ज्योती पटेल यांच्या विरोधात ग्राहकांशी अरेरावी ची भाषा वापरत रेशनिंग कार्ड ग्राहकांना फेकून देत असे, याबाबत साधारण एका वर्षांपूर्वी निलेश म्हात्रे या ग्रामस्थांनी सदर रास्त भाव धान्य दुकान चालकाची तालुका पुरवठा अधिकारी यांच्या कडे केली होती, सदर तक्रारी ची दखल घेत पालघर तहसीलदार यांच्याकडून सदर दुकानावर कारवाई करत दुकान बंद करण्यात आली होती. परंतु दुकान चालकाला शासनाकडून धान्य वाटपाचे काम पुन्हा देण्यात आले. शिधा वाटप पुन्हा त्याच दुकानाला परत मिळाल्यामुळे गावकऱ्यांना पुन्हा दुकांदाराच्या उद्धटपणा व मुजोरपणेच्या सामना करावा लागला, याबाबत माहीम गावाच्या महिलांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदाराला विरोध करत धान्य घेण्यास नकार दिला, व याबाबत माहीम ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक करबट यांच्या गाऱ्हाणे मांडले, याची दखल घेत सरपंच दीपक करबट तसेच ग्रामविकास अधिकारी विजय बिल्लेवार यांनी घटनास्थळी दाखल होत सर्व प्रकार समजून घेत पुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना बोलवून घेतले.
चौकट १
जे रास्त भाव धान्य दुकान सहा महिन्या पूर्वी शिधा पत्रिका धारकाच्या तक्रारीवर बंद करण्यात आला होता, ते पुन्हा त्याच दुकान मालकाला कसा काय देण्यात आला??
गोपी चाकर, ग्रामस्थ, माहीम गाव
चौकट २
सदर रास्त भाव धान्य दुकानाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून चौकशीचे आदेश आलेले आहेत. त्याअनुषंगाने शिधा पत्रिका धारकांची तक्रारी प्रमाणे आम्ही चौकशी केली आहे, व याचा अहवाल आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.
शामली धपाडे, तालुका पुरवठा अधिकारी, पालघर

No comments: