वाढवण बंदर विरोधात आंदोलन, वाढवण बंदरातून JNPT चले जाव, आदीची घोषणाबाजी, मासेमारी बंद, मासळी मार्केट बंद
वाढवण बंदर विरोधात आंदोलन, वाढवण बंदरातून JNPT चले जाव, आदीची घोषणाबाजी, मासेमारी बंद, मासळी मार्केट बंद,
पालघर : वाढवण बंदर विरोधात आज सिंधुदुर्ग ते झाई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. किनाऱ्यावरील गावांच्या लोकांकडून साखळी त्यार करून वाढवण बंदर विरोधी घोषनेबाजी करण्यात आली. नॅशनल फिश वर्कर्स फोरम (NFF), महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ, पालघर-ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, पालघर कष्टकरी संघटना तसेच आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित या वाढवण विरोधी आंदोलनाला येथील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या दरम्यान प्रत्येक गावातील कोळीवाड्यात मोठ्याप्रमाणात मिरवणूक काढून वाढवण बंदर विरोधी तसेच केंद्र व राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत केंद्र शासनाने होणाऱ्या वाढवण बंदर रद्द केले नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा ही यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात उत्तन या कोळीवाड्यात देखील आंदोलनात येथील कोळी बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. तर पालघर जिल्ह्यातील वसई पाचू बंदर, नायगाव,खोचिवडे,अर्नाळा, दातीवरे,कोरे,एडवण, उसरणी, के. दांडा,केळवा, के. दादर , के. माहीम, टेम्भी, वडराई, शिरगाव, सातपाटी, खारेकुरण, मुरबे,नवापूर, नांदगाव, आलेवाडी, दांडी, उच्छेळी, घिवली, कंबोडा, तारापूर, चिंचणी, चिंचणी दांडेपडा, वरोर, वाढवण, गुंगवडा, धाकटी डहाणू, डहाणू, नरपड,चिखला, घोलवड, बोर्डी, झाई गावात बंद करून निषेध केला गेला .
या आंदोलनास ससून डाॅक, भाऊचा धक्का, छत्रपती शिवाजीमहाराज मंडई (क्राफोर्ड मार्केट) मालाड मार्केट येथील सी फूड असोसिएशन यांनी पाठिंबा जाहीर करून मार्केट बंद ठेवली होती. मुंबई शहर व उपनगर येथील कोळीवाड्यात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, मुंबई अध्यक्ष परशुराम मेहेर, महिला संघटक उज्वला पाटील, मच्छीमार संस्था अध्यक्ष जयेश भोईर, दिलिप कोळी, सदस्य भुवनेश्वर धनु, सी फूड असोसिएशनचे कृष्णा पोवळे, अब्दुल गफार, कृष्णा चव्हाण, बळवन्त पवार इत्यादींनी आपली उपस्थिती लावली. तर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, जिल्हा अध्यक्ष वेलेरीन पांडीक इत्यादींनी काम पाहिले.
पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महिला संघटक पूर्णिमा मेहेर, ज्योती मेहेर, उपाध्यक्ष राजन मेहेर, अशोक अंभीरे, सुभाष तामोरे, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघचे अध्यक्ष जयकुमार भाय, जगदीश नाईक, मोरेश्र्वर वैती, मानवेंद्र आरेकर, विजय थाटू, हेमंत तामोरे, धनंजय तरे, जयवन्त तांडेल, प्रशांत नाईक, वैभव भोईर, भिवनेश्वर पागधरे, दर्शना पागधरे, प्राची नाईक, रेखा तरे, हर्षदा तरे, महानंदा राऊत, जयमाला दांडेकर, संगीता नाईक आदी उपस्थित होते.

No comments: