test

बोईसर मध्ये प्रेमींनी केली प्रियकेची गोळी झाडुन हत्या;हत्या नंतर सीआयएसएफच्या गाडी समोर उडी मारून प्रेमींचीही आत्महत्या

बोईसर मध्ये प्रेमींनी केली प्रियकेची गोळी झाडुन हत्या;
हत्या नंतर सीआयएसएफच्या गाडी समोर उडी मारून प्रेमींचीही आत्महत्या
पालघर : बोईसर येथील टीमा रुग्णालय जवळ एका तरुणांने प्रियकेची गोळी झाळून हत्या केल्याची घटना घडली असून यात प्रियकेची जाग्यावरच मृत्यू झाली आहे, तर प्रियकेवर गोळी झाडल्या नंतर तर तरुणाने देखील सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स(सीआयएसएफ) च्या गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने बोईसर मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोळीबाराची ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांनी वर्तविला असून याबत पुढील तपास सुरू आहे.
बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा सत्यदेव यादव (रा. कोलवडे) या तरुणाने नेहा मेहतो (रा.सरावली वय २१ वर्षे) या तरुणीची स्वतःजवळील गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. तरुणीवर गोळी झाडल्यावर झाडल्यावर घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर डी डेकोर कंपनीजवळ आरोपी कृष्णा यादव यांनी ही सीआयएसएफच्या गाडी समोर उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले, ज्यात आरोपी जखमी झाला होता, मात्र उपचारासाठी टीमा रुग्णालयात दाखल केले असता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बोईसर पोलिसांना या घटनेची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, पिस्टल हस्तगत केले आहे तसेच पुढील तपास सुरू केले आहे.

No comments:

Powered by Blogger.