test

पालघर शहरा मध्ये नातेवाईकाकडूनच ५ वर्षीय मुलीचे अपहरण घटनेला २ तास न होताच पालघर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तुरंगात पाठवले.

पालघर शहरा मध्ये नातेवाईकाकडूनच ५ वर्षीय मुलीचे अपहरण

 

पालघर मध्ये एका लहान मुलीच्या अपहरण तिच्या नातेवाईकांनी केल्याची घटनेला २ तास न होताच पालघर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तुरंगात पाठवले आहे, व मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप परत केले आहे. यामुळे जनतेकडून पोलिसांची कौतुक होत आहे.
पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तपासाची सूत्रे तात्काळ फिरवून केळवे स्थानकातून आरोपी तरुण प्रीतम उर्फ सन्नी कांबळे आणि बालिकेला ताब्यात घेण्यात आले.पालघर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी याची गंभीरता जाणून तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वा खाली 
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे,पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाड, अंमलदार रमेश पालवे 
कल्पेश पाटील, सागर राऊत, भगवान आव्हाड,सुयोग कांबळे यांचे पथक तयार करून बालिकेचा शोध घेण्यासाठी रवाना केले. सायबर गुन्हे शाखेतील अंमलदार राहुल क्षत्रिय,यांनी लोकेशन तपासकरून शोध पथकातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून तपास केला.या गुन्ह्यात केळवा, सफाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी देखील तपास केला आणि सहकार्य केले.
बालिकेच्या वडिलांना पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यात दोन दोन हजार रुपये टाकत ठेवायला सांगून आरोपीचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी शोधले आणि बालिके सोबत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या साठी पालघर पोलिसांचे कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.