कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिह्यातील हजारो जनसमुदायाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा
कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिह्यातील हजारो जनसमुदायाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा
पालघर जिह्याच्या विकासाला कुठेही कमतरता भासू देणार नाही- मुख्यमंत्र्याची ग्वाही
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिह्यातील ३५०० च्या वर जनसमुदायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना पाठींबा देत पालघर जिह्याच्या विविध प्रश्नांकरिता आपली भूमिका मांडली . याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील इभाड यांच्या सोबत डहाणू तलासरी येथील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते, विविध गावातून निवडून आलेले सरपंच , उपसरपंच पालघरच्या नगरसेविका शेरबानो शेख , शिवसेना व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रचंड मोठ्या संख्येच्या जनसमुदयाने पाठिंबा दिला त्यानंतर वर्षा या निवासस्थानी त्याचे सभेत रूपांतर झाले . यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंदन संखे यांची पाठ थोपाटत ते विविध माध्यमातून जिल्ह्यात गेली वर्षोनुवर्षे करीत असलेल्या कार्याची प्रशंसा करीत कार्याचा गौरव केला व पालघर जिह्यातील कुठल्याही प्रश्नांकरिता सरकार संवेदनशील असून जिह्याच्या प्रगतिकरिता शासन निधीची कमतरता भासू देणार नाही याची ग्वाही दिली. जिह्यातील बहुसंख्येने असलेल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध असून जिह्यात सुरू असलेल्या प्रकल्पात स्थनिक जनतेला विश्वासात घेऊन तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच तेथे आलेल्या विविध सरपंचांनी आपल्या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना दिले तर जिह्यात फसवणूक झालेल्या मैत्रेय च्या हजारो सभासदांना न्याय देण्याकरिताही मुख्यमंत्रांना निवेदन देण्यात आले .
कुंदन संखे यांच्या माध्यमातून आलेल्या हजारो जनसमुदायामुळे व घोषणांमुळे येथील संपूर्ण परिसर गजबजून गेला तर पोलीस व्यवस्थापनाचीही तारांबळ उडाली होती शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यानी कुंदन संखे यांचे कौतुक करीत आलेल्या जनसमुदायाला व्यवस्थित व घाई न करता आपआपल्या घरी जाण्याची विनंती केली.

No comments: