पालघर मध्ये अवैध बांधकामाला अभय कोणाचे?
अल्याळी येथील राजकीय आशीर्वादाने सुरु असलेल्या अवैध बांधकामावर कारवाई करू नये म्हणून मुख्याधिकारी यांच्यावर दबाव तर नाही ना ?
पालघर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्वे नंबर 422 प्लॉट नंबर 105मध्ये दिपेन इंटरप्राईजेस दिवाण अँड सन्स उद्योग नगर न्यू लाइफ स्टील कंपनी च्या बाजूला आरसीसी चें पक्के अनधिकृत बांधकाम बांधण्यात आला आहे ,सदरचे बांधकाम एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते रवी राठोड यांनी केले होते. तसेच सदरचे अवैध बांधकाम तात्काळ जमीनदोस्त करा व संबंधित विकासकावर एमआरटिपी अंतर्गत कारवाई करा व केलेल्या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित विकासाकडून वसूल करा अशी मागणी देखील त्यांनी राज्य शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर केली होती
सदर तक्रारीवर अवैध बांधकाम त्वरित बंद करण्यासंदर्भात नगरपरिषदेने नोटीस काढली होती परंतू कंपनी मालकाने नगरपरिषदेच्या नोटिसिला केराची टोपली दाखवत कंपाऊंड वॉल व मागच्या बाजूला शौचालय तसेच आडवी भिंत बांधली आहे सदर अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्याने कुठेतरी पाणी मुरतेय, अशी शंका घ्यायला जागा मिळत आहे तसेच मुख्याधिकारी स्वत: ते अवैध बांधकाम तोडण्यास इच्छुक नसल्याचे ही दिसून येत आहे.यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर अवैध बांधकाम तोडू नये म्हणून दबाव तर टाकला जात नाही ना अस प्रश्न उपस्थित होत आहे
तसेच पालघर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई संबंधित दीपेन इंटरप्रायजेस या अवैध बांधकाम करणाऱ्या कंपनीवर करण्यात आली नाही, यामुळे या कंपनीला राजकीय अभय असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर विषयाबाबत मुख्याधिकारी वैभव आवरे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता शक्य होईल ती कारवाई करू असे त्यांनी सांगितले
चौकट
अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात पालघर शहर सापडले असुन, विकास आराखडा फक्त कागदावरच राहिला आहे. प्रस्थापित लोकप्रतिनिधींचा बुरखा टराटरा जनतेसमोर फाडण्याची वेळ आली आहे, मुख्याधिकारी हे फक्त अनधिकृत बांधकामास अधिकृत करण्याचे जणू काही युनीफाईड विकास नियंत्रण नियमावलीचे अद्यावत मशीन घेऊन बसले आहेत व लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. नगरपरिषद हि नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे, अपयश लपविण्याचा प्रयत्न म्हणजे सभेच्या थेट प्रक्षेपणाचा दोन वर्षा अगोदार झालेला ठराव कागदावरच..!
सौ. अनिता शशिकांत किणी
स्थानिक नगरसेविका

No comments: