test

राजकीय आशीर्वादाने उभे राहिलेले हे अवैध बांधकाम तात्काळ जमीन दोस्त करा : रवी राठोड

राजकीय आशीर्वादाने उभे राहिलेले हे अवैध बांधकाम तात्काळ  जमीन दोस्त करा : रवी राठोड
    पालघर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्वे नंबर 422 प्लॉट नंबर 105मध्ये दिपेन इंटरप्राईजेस दिवाण अँड सन्स उद्योग नगर न्यू लाइफ स्टील कंपनीच्या बाजूला आरसीसी चें पक्क अनधिकृत बांधकाम बांधण्यात आला आहे ,सदरचे बांधकाम एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते रवी राठोड यांनी केला असून सदरचे अवैध बांधकाम तात्काळ जमीनदोस्त करा व संबंधित विकासकावर एमआर टिपी अंतर्गत कारवाई करा व केलेल्या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित विकासाकडून वसूल करा अशी तक्रार त्यांनी राज्य शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर केली आहे, मात्र नगराध्यक्ष हे राजकीय दबावाला बळी पडून सदर अवैध बांधकाम वरती कारवाई करण्यासाठी कचरत आहेत त्यामुळे त्यांचे देखील तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे
   हजारो चौरस फुटांचे अवैध बांधकाम केल्याने येथे नगरपरिषदेला नियोजित विकास करण्यासाठी अडथळा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पालघर परिषदेकडून कोणती  कायदेशीर बांधकाम परवानगी न घेता या ठिकाणी हजारो चौरस फुटांचे अवैध बांधकाम राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याबाबतची तक्रार व आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रवी राठोड यांनी केला आहे राजकीय आशीर्वादामुळे सदरच्या अवैध बांधकामाला संरक्षण मिळत असून आठवड्यात कारवाई न झाल्यास आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सदर राजकीय पुढार्‍यांच्या नावासहित तक्रार करणार असल्याचे रवी राठोड यांनी म्हटल आहे.

No comments:

Powered by Blogger.