test

विहिरीत उडी घेऊन अज्ञाताची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन अज्ञाताची आत्महत्या

दिनांक: १७/०५/२०२२

पालघर रेल्वे स्थानका बाहेरच पालघर पश्चिमेला गावडे चाल येथील एका जुन्या विहिरी मध्ये अंदाजी ३० ते ३५ वर्षाच्या अज्ञात इस्मानी उडी घेत आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना पालघर येथे घडली आहे, घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस व पालघर नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

पालघर पश्चिमेला असलेली गावडे चाल परिसरातील विहिरी मध्ये सकाळी 11 वाजता च्या सुमारास एका अज्ञात इस्मानी आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली, उडी घेतल्याने विहिरी मध्ये असलेल्या पाण्याचा जोरदार आवाज आल्याने जवळच्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीं महिलांनी तसेच बाजूला असलेल्या एका कांदा बटाटा च्या व्यापाऱ्यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्षपणे त्या अज्ञात इसमाला बुडतांना पाहिला, त्यानंतर त्यांनी त्वरित पालघर पोलीस ठाण्यात कळविले. पालघर पोलिसांनी देखील घटनेला गांभीर्याने घेत त्वरित घटना स्थळी पोलीस टीम पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोचून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले, काही वेळाने पालघर नगरपालिकेच्या नगरसेवक अरुण माने व कैलाश म्हात्रे देखील घटनास्थळी पोचले होते. बरेच तास परीश्रम करून ही सदर अज्ञात इसमाच्या काही ठावठिकाणा लागला नव्हता, नंतर काही वेळानी नगरपालिकेकडून जलतरण तज्ज्ञांचे पाचारण करण्यात आले, त्यांनी अथक परिश्रमानंतर विहिरीतुन मृतदेह शोधून काढला असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहे 

No comments:

Powered by Blogger.