test

ओबीसी आरक्षणासाठी गठीत समर्पित आयोगाचा भेटीच्या कार्यक्रम जाहीर;

ओबीसी आरक्षणासाठी गठीत समर्पित आयोगाच्या भेटीच्या कार्यक्रम जाहीर;

पालघर जिल्ह्यातुन जास्तीत जास्त निवेदन समर्पित आयोगाकडे पोहचवण्यासाठी पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे प्रयत्न..
राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. समर्पित आयोगाने कोकण विभागासाठी २५ मे ची दिनांक निर्धारित केली असून पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समिती कडून जिल्ह्यातील ओबीसींना पालघर शिक्षक पतपेढी भवन येथे २० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपली निवेदने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील यांनी आज जिल्ह्यातील ओबीसींसाठी एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करण्याऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावी आणि निवेदन देता यावीत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापुर्वी करावी असे आग्रह देखील पाटील यांच्या वतीने पत्रात करण्यात आले आहे. 

समर्पित आयोगाने कोकण विभागासाठी बुधवार दिनांक २५ मे २०२२ ही तारीख निश्वित केली आहे. पालघर जिल्ह्यातून जास्तीत जास्त निवदने समर्पित आयोगाकडे जावीत असा पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समिती चा प्रयत्न असणार आहे, तरी पालघर जिल्ह्यातील वैयक्तिक, सर्वज्ञाती संघटना, समाजसेवी संघटना, सामाजिक मंडळे ह्यांनी आपली निवेदने दिनांक २० मे २०२२ पर्यंत 'शिक्षक पतपेढी भवन, पालघर' या ठिकाणी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत जमा करावीत. आपली निवेदने शक्यतो लेटर पॅडवर, मुद्देसुद व थोडक्यात असावीत. त्यामुळे आपल्याला ती मुदतीपुर्वी समर्पित आयोगास पोहोचविता येतील. ज्यांना प्रत्यक्ष समर्पित आयोगासमोर हजर राहून आपले म्हणणे मांडावयाचे असेल त्यांनी आयोगाकडे अगोदर नोंदणी करावी व दिनांक २५ मे २०२२ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई ह्या ठिकाणी दुपारी २.०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे. त्याठिकाणी ओबीसी हक्क संघर्ष समिती पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहे अशी माहिती ही त्यांच्या कडून देण्यात आली आहे.

No comments:

Powered by Blogger.