test

“लोकप्रतिनिधी गेले, प्रशासक आले… पण गणरायालाही पालघरकरांच्या खड्ड्यांशीच नातं निभवावं लागलं!”

“लोकप्रतिनिधी गेले, प्रशासक आले… पण गणरायालाही पालघरकरांच्या खड्ड्यांशीच नातं निभवावं लागलं!”
पालघर : पालघर नगरपरिषद म्हणजे केवळ नावापुरते प्रशासन! लोकप्रतिनिधी असताना शहरवासीयांना खड्ड्यांच्या नरकयात्रेला सामोरे जावे लागत होते. जनतेला वाटले की प्रशासक नेमल्यावर काहीतरी बदल होईल. पण दुर्दैवाने परिस्थिती आजही तशीच आहे – खड्डे ते खड्डेच!

नागरिकांचा सरळ सवाल – “नेमकं फरक काय? लोकप्रतिनिधी असोत वा प्रशासक, आमच्या डोक्यावर खड्ड्यांचा शाप का कायम आहे?”

रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून निघण्यासारखे झाले आहे. अपघातांचे सत्र सुरूच आहे. या दुर्दशेचे आणखी लाजिरवाणे चित्र म्हणजे – गणरायालाही या खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागला! पालघर नगरपरिषद प्रशासनाला यापेक्षा मोठी लाज कसली असू शकते?

खड्ड्यांनी नागरिकांचे हाल संपले नाहीतच, पण बाप्पालाही या अक्षम्य बेफिकिरीचा त्रास सहन करावा लागला. याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन नागरिकांच्या संयमाची कसोटी पाहत असून संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.

आज प्रश्न एकच – खड्डे बुजवणार कोण? की पालघरकर आणि गणरायासह सगळ्यांनीच कायम या नगरपरिषद प्रशासनाच्या नालायकपणाचा शाप भोगायचा?

No comments:

Powered by Blogger.