पालघर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान – रस्त्यांची दुरवस्था, नगरपरिषदेला निवेदन
पालघर : पालघर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गणेश नगर (पालघर पूर्व), लोकमान्य नगर, विष्णु नगर, आदर्श नगर, पिलेना नगर या भागांत गटारे नसल्याने ४ ते ५ फुट पाणी साचले. दरवर्षीच पाण्याचा निचरा न होण्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यात तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे फक्त घरांमध्येच पाणी शिरले नाही, तर पालघर शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था देखील खड्डेमय झाली आहे. जगदंबा हॉटेल ते आंबेडकर चौक रस्ता, आंबेडकर नगर (पालघर पूर्व) ते नवली जोडणारा रस्ता, पाचबत्ती ते वळणनाका, पाचबत्ती ते तहसिलदार कार्यालय, पाचबत्ती ते देवीशहा मार्गे जुना पालघर हे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत.
गौरी-गणपती उत्सवाच्या अगोदर या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

No comments: