test

बोईसर चिल्हार रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन....!

बोईसर चिल्हार रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन....!
पालघर:  तारापूर अनुशक्ती केंद्रा कडे जाणारा एकमेव रस्ता असलेल्या,ह्या चिल्हार बोईसर रस्त्यावर सतत अपघात होत असतात. ह्या होणाऱ्या अपघाताना एम आई डी सी चे प्रभारी अधिकारी कारणीभूत आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांन कडून करण्यात येत आहे. या एका आठवड्यात चार मोठे अपघात झाले असून, या अपघाताना चिल्हार बोईसर रोड बनवणारे एम आई डी सी प्रशासन जिल्मेदार असल्यामुळे, आज चिल्हार बोईसर रस्ता काही काळा साठी बंद करून एम आई डी सी प्रशासनाचा निषेध नोंदविन्यत आला. या वेळी जनसामर्थ आदिवासी संघटनेचे महेश धोडी, स्मिता धोडी, आणि वाहन चालक मालक संघटनेचे हर्बन्स सिंग नन्नाडे, छावा संघटनेचे निलेश विचारे, सीमा करोतिया, ओवेज सेज लेट्स दु समथिंग चे जावेद लुलानिया, आणि मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष सहकारी उपस्थित होते.
(टीप. एम आई डी सी प्रशासनाचे म्हणने जाणून घेण्यासाठी एम आई डी सी चे उपअभियंता अविनाश संखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.)

No comments:

Powered by Blogger.