test

मुरबे गावात गावित यांना स्थानिक भूमीपुत्रांनी दाखवले काळे झेंडे, गावितांकरिता किनारपट्टी भागातील वाट अवघड

मुरबे गावात गावित यांना स्थानिक भूमीपुत्रांनी दाखवले काळे झेंडे, 
 गावितांकरिता किनारपट्टी भागातील वाट अवघड
                      वृत्त नायक मराठी न्यूज नेटवर्क 

पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात रोखून बंदराच्या विरोधात स्थानिक भूमीपुत्रांनी वाढवण बंद रद्द करण्याच्या घोषणा देत तसेच मुरबे बंदर रद्द करा अशा प्रकारच्या घोषणा देऊन प्रचार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 भूमिपुत्रांनी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला.
किनारपट्टी भागातील स्थानिक भूमिपुत्र राजेंद्र गावित यांच्यावर भलतेच नाराज असल्याचे सूर किनारपट्टी भागात उमटत आहेत, गावित यांनी खासदार होण्याअगोदर वाढवण बंदराविरोधात भूमिका घेतली होती असे असताना शब्द देऊनही खासदार झाल्यानंतर वाढवण बंदराच्या भूमिकेबद्दल मौन पाळले  व सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला म्हणून त्यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत.प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्प सध्या गतिशील असताना किनारपट्टी भागातील गावकरी आक्रमक भूमिका घेत आहेत.गावित यांच्यासाठी किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे.
सातपाटी, मुरबे, ते वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील मतदार हा राजेंद्र गावित यांना वोट करतो या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांच्या करिता महत्त्वाची आहेत. वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये सरकार विरोधात रोष आहे.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित प्रचारासाठी मुरबे गावात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.जेएसडब्ल्यू जिंदाल बंदरामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे मच्छिमारांमध्ये प्रचंड रोष आहे.यावेळी बंदरपट्टीतील मतदारांचा गाविताना विरोध होत असल्यामुळे त्यांच्यासमोर निवडणूक प्रचार कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे.

No comments:

Powered by Blogger.