test

जिजाऊ संघटनेच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

जिजाऊ संघटनेच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 

पालघर येथील कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याला उत्सफुर्त प्रतिसाद 

वृत्त नायक मराठी न्यूज नेटवर्क 
पालघर : पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली या या ठिकाणी  जिजाऊ संघटनेच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील  मान्यवरांचा  सन्मान करण्यासाठी "कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024" हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मानचिन्ह देत त्यांना सन्मानित करण्यात आले. 

जिजाऊ संघटनेच्या वतीने झडपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024 या सोहळ्यात कुणबी समाजातील विविध क्षेत्रात विशेष लौकीक प्राप्त केलेल्या एकूण २५० व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कुणबी समाज हा शेतात घाम गाळणारा, वेळ आल्यावर देशासाठी रक्त सांडणारा म्हणून आपली ओळख आहे. आपली परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपत या समाजाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि समाजाच्या एकत्रिकरणासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे  यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. 
कुणबी समाजातल्या ज्या ज्या समाजबांधवांणी समाजाला प्रेरणादायी ठरेल असे काम केले अश्या समाजबांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भविष्यात समाजातल्या इतर नवतरुण युवकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा यासाठी हा जो सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी आयोजकांचे मनापसून कौतुक आहे असे सांगत माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. निलेश सांबरे यांचे कार्य हे समाजाने प्रेरणा घ्यावी असेच आहे . कुठलेही राजकीय पद आणि सत्ता हातात नसतानाही सांबरे यांचे चालू असलेले काम हे मोठ मोठ्या सत्ताधा-र्यांना देखील शक्य होत नाही . असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
  यावेळी लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवावर बोलताना जिजाऊ संघटनेचे  अध्यक्ष निलेश सांबरे म्हणाले की मोठ मोठे युती असलेले बलाढ्य प्रस्थापित पक्ष आपल्या समोर लढतीत उभे असतानाही आपल्याला मिळालेल्या मतांचा टक्का हा खूप प्रभावी होता. त्यामुळे ही आपली हार नसून जितच आहे. येणाऱ्या निवडणुकीत ५ पालकमंत्री हे आपळ्या कुणबी समाजातले असतील हा मी शब्द देतो असे देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासीत केले. आता आपल्या समाजाने मोठी स्वप्न बघण्याची वेळ आली आहे. कलेक्टर, डॉक्टर , CA, उच्च न्यायाधीश पासून ते प्रधानमंत्री कार्यालय चालवणाऱ्यांपर्यंत आपले बांधव पोहचण्यासाठी जिजाऊ नेहमीच तत्पर आहे. मात्र कुठल्याही समाजाला न दुखवता आपल्याला आपला समाज घेऊन पुढे जायचे आहे असे प्रतिपादन सांबरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सुभाष पवार - जिल्हा परिषद उपाध्यक्ष,अशोक वालम-कुणबी एकीकरण समिती अध्यक्ष,रोहिणी शेलार- सभापती महिला व बालकल्याण पालघर जिल्हा, मारुती धीर्डे- शिवसेना तालुका प्रमुख , मोनिका मोहन पानवे- भिवंडी लोकसभा प्रमुख आदिजण उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी ठाणे पालघरच नाही तर संपुर्ण कोकणातुन मोठ्या संख्येने कुणबी समाज आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.