पालघर नगर परिषदेचा भोंगळ कारभारामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात
पालघर : मोकाट जनावरांचा झुंडीमुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन वाहतूक सुरळीत करत असताना वाहतूक पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दृश्य शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिसुन आले आहे.पालघर नगरपरिषदेचा भोंगळ कारभारामुळे मोकाट फिरणारे जनावरांनामुळे अनेक अपघात होऊन जीव ही जात आहे मात्र नगरपरिषद प्रशासनाचा मोकाट जनावरांवर कुठलाही उपाय योजना नाही
शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर जणु काही जनावराचा साम्राज्य असल्यामुळें वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर सावरकर चौक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौक परिसरात अनेकदा रस्त्यावर जनावरे आल्याने वाहतूक खोळबते तसेच रस्त्यात जनावरे बसल्याने अपघात होतात शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यावर उभा किंवा बसलेला असतो. वास्तविक पाहता ही जनावरे मोकाट नसून कोणीतरी पाळलेली जनावरे आहेत. खाण्यापिण्यासाठी ही जनावरे सकाळी सोडली जातात रात्री ही जनावरे परत घरी जातात.
पालघर पालघर नगरपरिषदेकडे कोंडवाडा अस्तित्वात नाही. जनावर मालकांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. आठवडा बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांसह पाळलेल्या जनावरांचा सुळसुळाट असतो. त्यांचा बंदोबस्त करण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही. त्याचे परिणाम वाहन चालकांसह पादचारी व वाहतूक पोलिसांना भोगावे लागत आहेत.
ठळक
पालघर शहरातील मालकांनी जनावरांना मोकाट सोडल्याने मोकाट गाई, बैल, म्हैशी आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे, तर वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. अशा बेजबाबदार जनावर मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

No comments: