नवापूरचे माजी उपसरपंच राकेश पागधरे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत.
पालघर : नवापूर भागातील बहुजन विकास आघाडीचे खंदे पदाधिकारी, माजी उपसरपंच व गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून सातत्याने निवडून येणारे राकेश पागधरे यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाने प्रभावीत होऊन राकेश पागधरे यांनी पालघर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बहुतांश कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. संखे यांनी भगवा झेंडा व शिवसेनेची शाल घालून पागधरे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्यांचे स्वागत केले, यावेळेस शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा महिला संपर्क संघटीका भारती गावकर, जिल्हा संघटीका वैदेही वाढाण उपस्थित होते.
पालघर विधानसभा क्षेत्रात राकेश पागधरे यांचा प्रभाव असून त्यांचा राजकीय, सामाजिक व जनसंपर्क दांडगा आहे. मच्छिमार समाजात त्यांचा प्रभाव आहे. सामाजिक व गावाच्या सामाजिक कार्यात ते सतत अग्रेसर असतात. शिवसेनेच्या माध्यमातून पागधरे जनसामान्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देतील. ते सामाजिक कार्ये तितक्याच जोमाने करतील. पक्ष वाढीसह पक्षाच्या जनसेवेचा मुख्य उद्देश पागधरे नक्कीच सफल करतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात व्यक्त केला.
राकेश पागधरे हे नवापूर परिसरातील सक्रिय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते चार वेळा निवडून आले असून त्यांनी नवापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच पद भूषवले आहे. सध्या ते विद्यमान सदस्य आहेत. यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अरविंद आरेकर, सुनील बारी, अरविंद पागधरे, अरुण बारी, महेश मेहेर,राजेन्द बारी,रवींद्र तांडेल,तुषार पागधरे,अंकेत पागधरे, कृष्णा धनु या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

No comments: