test

भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त
ठाणे : भिवंडी शहरातील खाडीलगतच्या ठिकाणी असलेल्या इदगाह साल्टर हाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हशी व रेड कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवून ते शहरातील छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायीक यांना विक्री करीत असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.
 शहरातील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्याच्या चरबी पासून तूप बनविण्याचे काम सुरू होते या बाबत पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव,आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई करीत तेथे आढळून आलेले तूप कढविण्याच्या भट्टी वरील कढई मधील साहित्य ओतून देत,बनावट तुपाचे डब्बे,कढई असे मोठे साहित्य जप्त केले आहे .या बाबत पालिका प्रशासना कडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे.

No comments:

Powered by Blogger.