संघर्ष संघटनेच्या पाठपुराव्याला यश
--मुंबई बरोडा एक्सप्रेस कोरीडोर च्या कंत्राटदाराने ग्रामस्थांना दिली नुकसान भरपाई
पालघर तालुक्यातील करवाले वाळूतला या गावातील मुंबई बरोडा एक्सप्रेस कोरीडोर च्या कामामुळे ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले होते.ग्रामस्थांनच्या घरांचे झालेल्या नुकसानाची भरपाईची मागणी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून सुमन मानकर यांनी मुंबई बरोडा एक्सप्रेस कोरीडोर ची कंत्राटदार कंपनी जी आर इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.
पालघर तालुक्यातील डोलीव, खार्डी, सरोंडेपाडा, फलोटिपाडा, शेळडोंगरी, या भागातील बहुतेक ग्रामस्थांच्या घराला मुंबई बरोडा एक्सप्रेस कोरीडोर ची कंत्राटदार कंपनी जी आर इन्फ्रा कंपनीच्या कामा मध्ये डोंगर फोडण्याकरिता ब्लास्टिंग करत असून, त्या मुळे घरांचे नुकसान झाले होते.
ब्लास्टिंग मुळे झालेले नुकसान कंत्राटदार कंपनीने भरून द्यावे,म्हणून संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सुमन मानकर या फेब्रुवारी २०२३ पासून पाठपुरावा करीत होत्या, सुमन मानकरांच्या पाठपुराव्याला यश येऊन, कंत्राटदार जी आर इन्फ्रा कंपनीने बाळकृष्ण माळी, तुळसा माळी,नलिनी माळी, रेखा खानोरेकर, दत्ता पाटील,चंद्रकांत पाटील, रघुनाथ पाटील, जयेश पाटील, या ग्रामस्थांना नुकसान भरपाई दिली आहे.
संघर्ष संघटनेने फेब्रुवारी २०२३ पासून जून २०२३पर्यंत पाठपुरावा केला होता, त्याला आज यश आलेले असल्याने ग्रामस्थांनी संघर्ष संघटनेचे आभार मानले आहेत.या कार्यात संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सुमन मानकर यांच्या सह नितिन पाटील, भरत माळी, अशोक भोईर, आर.बी.सिंग यांनी मोलाचे सहकार्य केले आहे, ग्रामस्थांनी त्यांचे देखील आभार मानले आहेत.
----------

No comments: