पालघर जिह्याच्या आरोग्यव्यवस्थेकरिता अत्यंत महत्त्वाची बाब
१५० बेडचे अद्ययावत कामगार रुग्णालय कुंभवली येथे होणार
पालघर जिल्यातील कामगारांकरिता रुग्णालय होण्याच्या मागणीला यश येत मुख्य जागेच्या अडचणी सोडवण्याकरिता शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी पालघर तालुक्यातील कुंभवली येथील जागा तेथील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मोकळी करून तसा ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यानंतर १५० बेडचे अद्ययावत रुग्णालय(Esic Hospital) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्देश दिल्यानंतर जिल्हा व आयुक्त प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून शासनस्तरावरूनही हस्तांतरांची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामांस लवकरच सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे यात सर्वसामान्यांकरिताही (non esic) ३०टक्के जागा यात असणार आहे. स्वतः मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी बोईसर येथे ही घोषणा केल्याने पालघर जिह्याच्या आरोग्यववस्थेचा अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागणार आहे.

No comments: