बंजारा समाजाचे नेते मा. आ.संजय राठोड यांना जो पक्ष सोबतच जे नेते मदतीचा हात देईल त्याला संपूर्ण बंजारा समाज सदैव साथ देईल. रवि राठोड
बंजारा समाजाचे नेते मा. आ.संजय राठोड यांना जो पक्ष सोबतच जे नेते मदतीचा हात देईल त्याला संपूर्ण बंजारा समाज सदैव साथ देईल. रवि राठोड
महाराष्ट्रातील राजकीय हालचाल पाहता या हालचाली मध्ये बंजारा समाज दुर्लक्षित होत आहे की काय हा एक प्रश्न पडतो आहे.पहिलेच बंजारा समाजासमोर ऊसतोड कामगार, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, नाका कामगार,बांधकाम कामगार अठराविश्व दारिद्र्य अंगा खांद्यावर घेऊन जीवन जगणारे तांड्यातील अनेक समाजबांधव ,आरक्षणाचा प्रश्न नॉन क्रिमीलेअर चा प्रश्न सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक आरोग्य समस्या आणि अनेक सोयीसुविधा पासून बंजारा समाज वंचित असून आज कुठे आ संजय राठोड यांच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होताना दिसत होते परंतु आजचे राजकीय वातावरण पाहता आ. संजय राठोड हे मंत्री पदाचे दावेदार असून त्यांनी समाजासाठी उचित आणि कठोर निर्णय घेणे हे आज गरजेचे आहे.त्यांच्यामार्फत आतापर्यंत सामाजिक विकास होत आलेला आहे. पोहरादेवी सह अनेक बंजारा समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकास कामात सातत्य राहावे म्हणून आ संजय राठोड यांनी समाजाच्या हितासाठी राजकीय हालचालींमध्ये योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती बंजारा समाज करत असल्याचे राष्ट्रीय बंजारा टायगर्स महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रवी राठोड यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून आ. संजय राठोड यांना केली आहे समाज सदैव तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे सोबतच तुमच्या संकटात सदैव धावून येणार आहे असेही रवी राठोड यांनी सांगितले आहे.

No comments: