test

ग्रामपंचायतीचे पथदीवे दिवसा सुरू आढळल्यास होणार वीजपुरवठा खंडित

ग्रामपंचायतीचे पथदीवे दिवसा सुरू आढळल्यास होणार वीजपुरवठा खंडित

खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण: १३ जून २०२२

दिवसा पथदिवे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहून कारवाई करण्याचे आदेश मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांनी नुकतेच दिले आहेत. तर पथदिवे दिवसा सुरू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून खबरदारी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला केले आहे.

ठराविक वेळेत पथदिवे चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा किंवा या कामासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतींचे पथदिवे दिवसाही सुरु राहतात. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या संचालन व वीजबिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे असते. महावितरणकडून स्वतंत्र वीजवाहिनीद्वारे पथदिव्यांसाठी जोडणी देण्यात येते. दिवसा दिवे सुरू राहिल्याने विनाकारण विजेचा अपव्यय व पर्यायाने संबंधित ग्रामपंचायतीचेही नुकसान होते. ते टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पथदिवे ठराविक वेळेत चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा बसवावी किंवा मनुष्यबळाची व्यवस्था करावी. यापुढे दिवसा पथदिवे सुरू आढळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कल्याण परिमंडलात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या वीजजोडण्यांची (कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक वगळून) संख्या जवळपास १५५३ आहे. पथदिव्यांच्या जाडण्यांचे एप्रिल २०२२ महिन्याच्या चालू बिलातील १ कोटी १६ लाख तर मे २०२२ महिन्याच्या चालू बिलातील २ कोटी ५४ लाख रुपये थकीत आहेत. तर एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यानचे २१ कोटी ३ लाख रुपयांचे चालू वीजबिल थकबाकीत आहे. चालू वीजबिल भरून पथदिव्यांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे. 


No comments:

Powered by Blogger.