test

राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी अमोल रावसाहेब राठोड यांची निवड…!!

राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी अमोल रावसाहेब राठोड यांची निवड…!!
राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बालेपिर बीड येथील रहिवाशी अमोल रावसाहेब राठोड यांची प्रदेशाध्यक्ष गजानन जाधव यांच्या संमतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी नियुक्ती पत्र देवून निवड केली असून त्यांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यात संघटना घरा घरात पोहचविण्यासाठी काम करावे यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये मान उंचावेल अशी झेप घेत आहे. या संघटनेमध्ये दांडगा जन संपर्क मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच बंजारा समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे माननीय श्री आत्मारामभाऊ जाधव यांच्या विचारांवर प्रभावित होवून अनेक तरुण एकत्र येत आहेत. व तेच विचार समाजात प्रत्येक गावात/ तांड्यात पोहचवायचे आहेत म्हणून ही निवड करण्यात येत आहे..

No comments:

Powered by Blogger.