आर पी आय (आ ) व वन रुपी क्लीनिक यांच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न.
पालघर (बोईसर) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , मॅजिक डील ग्रुप ऑफ कंपनी वन रुपी
क्लीनिक व डॉ. मित्र परिवार यांच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचं
रविवार दिनांक ०१/१०/२०२3 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, दहिसर तर्फे तारापूर
-पाचमार्ग येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात मोफत E C G (इलेक्ट्रो कार्डिओग्राफ) H G T (इन्स्टंट ग्लुकोज टेस्ट)
बी. पी., B M I, वजन,स्त्री रोग तपासणी, त्वचारोग तपासणी,
गरोदर माता तपासणी, दंत रोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्र तपासणी, ०१ महिना ते
१५ पंधरा वर्षापर्यंत मुलांसाठी सुवर्ण प्राशन तसेच रुटीन चेकअप व मोफत
वैद्यकीय सल्ला आवश्यकतेनुसार अनेक नागरिकांना मोफत औषधे व इंजेक्शन
देण्यात आली.
तसेच अतिअल्प दरात फिजिओथेरपीस्ट,ॲक्युपंक्चर ची सेवा उपलब्ध करून
देण्यात आली या शिबिराचा फायदा परिसरातील जवळजवळ २५० ते ३०० गोर गरीब
नागरिकांनी घेतला. यात लहान मुलं, तरुण वर्ग,गरोदर माता,ज्येष्ठ नागरिक व
महिला अशी अनेक लोकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
या
शिबिराचे उद्घाटन तत्कालीन पोलीस उपअधिक्षक.के एस हेगाजे यांच्या हस्ते
पार पडले यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा पक्ष
निरीक्षक पालघर ठाणे सुरेश बारशिंगे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव ,
ग्रामसेविका रिना म्हात्रे, कार्याध्यक्ष सचिन लोखंडे ,डॉ. संजय गवळी
(मॅनेजर वन रुपी क्लीनिक ),उप सरपंच अमित चुरी , ग्रामपंचायत सदस्य अमोल
मोरे , जिल्हा उपाध्यक्ष नवीन त्रिपाठी , दीपा जाधव , माजी विस्तार
अधिकारी शांताराम जाधव , युवा कार्याध्यक्ष विजेंद्र जगदीश ठाकुर , पालघर
तालुका अध्यक्ष नासीर अंसारी , सचिन घाडीगावकर किरण दिवेकर,
उमेश घरत ,भुवनेश्वर लोखंडे, संतोष मोरे,कमलाकर जाधव.शरद धस,स्वप्निल चौधरी,राम
जाधव,शैलजा जाधव,कृतिका घरत, डॉ. काशिनाथ चौधरी, सुधीर चूरी, दीपेश गायकवाड, व
जगदीश गायकवाड तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रमाचे आयोजन रिपाईचे पालघर तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव, मॅजिक
डील ग्रुप च्या पालघर युनिट च्या प्रमुख डॉ. रुचा
भोईर(कॅन्सलटिंग फिजिशियन), पालघर तालुका महिला आघाडी अध्यक्षा तृप्ती मोरे,
पालघर तालुका अध्यक्ष नरेंद्र करणकाळे , युवा उपाध्यक्ष राम ठाकूर यांनी
केले होते.
या
शिबिरात आरोग्य सेवा देण्यासाठी प्रमुख डॉ. रुचा भोईर (कॅन्सलटिंग
फिजिशियन),डॉ. संजय गवळी,डॉ.देशपांडे मॅडम ( गरोदर माता व महिला
तपासणी ), डॉ. एकता सोमय्या ( दंतरोग चिकित्सक ), डॉ. गोपाल घुगे (
बालरोगतज्ञ ), डॉ.काशिनाथ आंबेकर ( नेत्र चिकित्सक अधिकारी ), डॉ. निकिता
मोरे ( त्वचारोग तज्ञ ) डॉ.सुवर्णा मेश्राम ( न्यूट्रिशियन डायटीशियन,
कन्सल्टिंग अँड वेट मॅनेजमेंट ) डॉ. मिलिंद मेश्राम (फिजिओथेरपिस्ट,ॲक्युपंक्चर
) पूजा जाधव (सिस्टर इनचार्ज) माधवी तरे, सुरेखा पांचाळ, धनश्री मोहिते,
सहाय्यक राजेंद्र भावसार,मंगेश जाधव,धनश्री जाधव शांताई नर्सिंग होम च्या
अस्मिता भोईर व सिस्टरचा स्टाफ तसेच तारापूर पी एस सी येथील सिस्टर्स स्टाफ अशा
अनेकांनी मिळून उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली शेकडो पेक्षा जास्त
गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरात विविध वैद्यकीय तज्ञांनी मोफत आरोग्य
तपासणी व उपचार केले.याशिवाय, त्यांनी नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देखील
दिली.
"प्रतिक्रिया''
आम्ही भविष्यात देखील अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करत राहू. आमचा उद्देश
समाजातील तळागळातील गोर-गरीब गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देणे
हेच आहे.
शरद जाधव
युवा तालुका
अध्यक्ष
आर पी आय (आ) पालघर

No comments: