test

बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर....

तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन!
(तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली,
बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले)
दारव्हा: बंजारा समाज तीजउत्सव संस्कृती पूर्वीपासूनच जपत असलेला समाज आहे. बंजारा समाजात अनेक तांड्यात व शहरात आपली रुढी,परंपरा व आपली संस्कृती जपत राज्यामध्ये आपली बोलीभाषा कायम ठेवून संस्कृतीचा पायांडा तांड्यावर व शहरांमध्ये तीज उत्साहाच्या दरम्यान पाहायला मिळतो.
नायक,कारभारी,हसाबी नसाबी, युवक, युवती, महिला सर्व मिळून यासणांचा आनंद वाढावा यासाठी श्रीकृष्णाला व संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरवात केली जाते.
शहरामध्ये दि.१० सप्टेंबर रोजी येथील कविता मंगल कार्यालयाजवळील बंजारा भवन येथे बंजारा समाजातील चालीरीती परंपरा अबाधित ठेवून तीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
हा तीज उत्सव कार्यक्रम टोपलीमध्ये जवाहर (गहू) टाकण्यापासून ते विसर्जन पर्यंत संपूर्ण समाज एकत्र येवून बंजारा समाजाची वेशभूषा,सांस्कृतिक गीत व नृत्य करून तसेच राधेकृष्णाची मूर्तीची स्थापना करून तीज उत्सव साजरा केला गेला तसेच संत सेवालाल महाराज व वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये शहरातील सर्व बंजारा बांधव,महिला भगिनी, तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा कार्यक्रम अगदी आनंदात व उत्साहात पार पाडला.

No comments:

Powered by Blogger.